Arogya Vibhag Mega Bharti 2020 – जवळपास 30 हजार जागा भरणार

Arogya Vibhag Mega bharti 2020

राज्य सरकार दीड महिन्यात मेगा भरती करणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

Arogya Vibhag Mega Bharti 2020 - Maharashtra Health Department is going to conduct mega recruitment. The health minister Mr. Rajesh Tope Sir announced that under this process approx 30,000 plus vacancies will be filled under health department, medical education department of state government and municipal corporations. All the details regarding this process will be updated on this page. 

काय म्हणाले आरोग्य मंत्री...

आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी सांगितले की माझ्या आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात जवळपास ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिका हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यातला आहे. या सगळ्या जागा पुढील दीड महिन्यात भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. सर्व पदे शैक्षणिक गुणांवरून भरण्यात येतील.

रिक्त जागांचा तपशील ?

  • आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा
  • वैद्यकीय शिक्षण विभागात जवळपास ११ हजार जागा
  • महापालिका हॉस्पिटलमध्ये हजारो जागा

सदर भरती प्रक्रियेअंतर्गत  विविध पदांच्या जाहिराती लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातींसंदर्भातील अधिक माहितीसाठी जॉब माझा ला दररोज भेट देत राहावी. जाहिरातींचा संपूर्ण तपशील व महत्वाच्या लिंक JobMajha.com वर अपडेट केल्या जातील.

मागील काही वर्षात आरोग्य विभागातील भरती प्रलंबित आहे. परंतु सध्या कोरोना मुळे आरोग्य विभागात मुबलक मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. आज उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. ते दमल्यानंतर नवीन दमाची टीम असणे गरजेचे आहे. या मुळे हि भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर पदे लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे. 

तर जॉबमाझाला (www.JobMajha.com) नियमित भेट देत रहा. 


Majhinaukri

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here